तुमचा यशाचा खरा सोबती – अभ्यास मित्र!

स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी, दर्जेदार DIGITAL NOTES आणि सोप्या भाषेत व्हिडिओ लेक्चर्स.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स

Latest Update

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (नविन भरती 1621 पदासाठी)

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६

जाहिरात क्रमांक : ०१७/२०२६

महत्त्वाची घोषणा: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण २,६१९ पदांच्या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक २७ सप्टेंबर, २०२६ पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने घेण्यात येईल.

१. पदांचा तपशील व संख्या

अ.क्र. संवर्ग (Post Name) विभाग (Department) एकूण पदे
उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
तांत्रिक सहायक वित्त विभाग (विमा संचालनालय)
कर सहायक (Tax Assistant) वित्त विभाग २८२
सहायक मोटार वाहन निरीक्षक गृह विभाग ४६१
लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व राज्य शासनाची विविध कार्यालये १८६४
एकूण पदे: २६१९

२. महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी: २७ जून, २०२६ (दुुपारी १४:०० पासून) ते १७ जुलै, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: १७ जुलै, २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
  • SBI बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक: १९ जुलै, २०२६
  • चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: २० जुलै, २०२६ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक: २७ सप्टेंबर, २०२६ पासून

३. पात्रता व वयोमर्यादा (Eligibility & Age Limit)

  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२६ रोजी (अमागास: किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/EWS: कमाल ४३ वर्षे. इतर सवलती नियमानुसार.)
  • शैक्षणिक पात्रता:
    • उद्योग निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी संबंधित विषयात पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree) आवश्यक.
    • इतर सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) आवश्यक.
  • टंकलेखन (Typing) पात्रता (कर सहायक व लिपिक पदांसाठी): मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (काही प्रवर्गांना तात्पुरती सूट उपलब्ध).

४. परीक्षा शुल्क (Application Fee)

  • अमागास (Open): ₹३९४/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹२९४/-
  • माजी सैनिक: ₹४४/-

सविस्तर अभ्यासक्रम आणि इतर अटींसाठी कृपया MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (https://mpsc.gov.in) भेट द्या.